लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

लोणावळा - रमजान ईदनिमित्त न वीकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्या आणि लोणावळा परिसरात सुरू असलेला रिमझिम पाऊस, आच्छादलेली धुक्‍याची दुलई या पार्श्‍वभूमीवर शनिवारी लोणावळा व खंडाळा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. पर्यटकांचे सर्वाधिक पसंती असलेल्या लायन्स पॉइंट, खंडाळ्यातील राजमाची उद्यान परिसर, पवना धरण परिसरात पर्यटकांची वर्षाविहारासाठी विशेष गर्दी झाली होती. 

लोणावळा व खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे असल्याने पर्यटक लोणावळा परिसरातील भुशी डॅम, लोणावळा तलाव, राजमाची, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरात सर्व मोसमामध्ये गर्दी करतात. शनिवार, रविवारला जोडून रमजान ईद आल्याने सलग सुट्ट्या आल्या आहे. त्यामुळे लोणावळा परिसरात पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. लोणावळा परिसराबरोबर पवना धरण परिसराला पर्यटकांची पसंती मिळत आहे. पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले लोणावळ्यातील भुशी धरण अद्याप भरले नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. 

हौशी ट्रेकर्सची भेट
लायन्स पॉइंट, अँम्बी व्हॅली, पवनानगर परिसरातील खासगी बोटिंग क्‍लबला पर्यटकांची पसंती मिळत आहे. कार्ला, भाजे लेणी, लोहगड, राजमाची परिसरातही हौशी ट्रेकर्सनी भेट देत सुटीची मजा लुटली. 

पर्यटकांची वर्दळ
कुटुंबवत्सल पर्यटकांबरोबर तरुण-तरुणी तसेच आबालवृद्धांचा समावेश होता. 

या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांची वर्दळ सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य पसरले आहे. पर्यटकांनी मोठी गर्दी केल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण आल्यामुळे वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या. मात्र, वाहतुकीची मोठी कोंडी झाली नाही. 

पावसाची रिमझिम
लोणावळा परिसरात शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला.  

Web Title: lonaval news tourist in lonavala