आठवडा उलटल्यानंतरही तपासातील प्रश्‍नचिन्ह कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

लोणावळा - लोणावळा दुहेरी खूनप्रकरणी पोलिस अद्याप कारणांचा शोध घेत असून, घटनेस आठवडा उलटल्यानंतरही तपासाबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे. गेल्या सोमवारी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सार्थक वाकचौरे (वय 22, रा. राहुरी, नगर) व श्रुती डुंबरे (वय 21, रा. ओतूर, जुन्नर) यांचे लोणावळा-ऍम्बी व्हॅली रस्त्यावर आयएनएस शिवाजी केंद्राजवळ मृतदेह आढळले होते. घटनेस आज आठ दिवस लोटल्यानंतरही पोलिस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचलेले नाहीत.

लोणावळा - लोणावळा दुहेरी खूनप्रकरणी पोलिस अद्याप कारणांचा शोध घेत असून, घटनेस आठवडा उलटल्यानंतरही तपासाबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे. गेल्या सोमवारी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सार्थक वाकचौरे (वय 22, रा. राहुरी, नगर) व श्रुती डुंबरे (वय 21, रा. ओतूर, जुन्नर) यांचे लोणावळा-ऍम्बी व्हॅली रस्त्यावर आयएनएस शिवाजी केंद्राजवळ मृतदेह आढळले होते. घटनेस आज आठ दिवस लोटल्यानंतरही पोलिस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचलेले नाहीत. संपूर्ण पोलिस यंत्रणा लोणावळ्यात ठाण मांडून असून, सार्थक व श्रुतीच्या खुनामागे वैयक्तिक वाद, प्रेमप्रकरण, लूटमार ते अगदी ऑनर किलिंगपर्यंत विद्यार्थ्यांच्या खुनामागील निश्‍चित कारण काय असू शकते, याचा शोध सुरू आहे. याचबरोबर घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही पोलिसांनी कयास बांधला असून, त्याआधारेही तपास सुरू आहे. मृत मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा निर्वाळा डॉक्‍टरांनी दिला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक एम. सुवेझ हक यांनी दिली आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात येत असून, सिंहगडच्या विद्यार्थ्यांसह स्थानिकांकडून माहिती घेण्यात येत आहे. पोलिसांना अद्याप काही ठोस माहिती हाती न लागल्याने पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे. 

Web Title: Lonavala double murder case