लोणावळा-खंडाळा परिसर गर्दीने फुलला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

लोणावळा - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जोडून आलेल्या सुट्यांमुळे वर्षाविहारासाठी पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा-खंडाळा परिसर फुलला होता. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर भिजण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी केली होती. पुण्या-मुंबईतील पर्यटकांचा यात मोठा भरणा होता.

गेल्या काही वर्षांत स्वातंत्र्य दिनास लोणावळा परिसरात वर्षाविहारासाठी येण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. पोलिसांनी गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. भुशी डॅमसह राजमाची, कुणे गाव, लोहगड, पवना धरण परिसरांत लायन्स पॉइंट, शूटिंग पॉइंट येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी (ता. १५) पुण्याहून येणाऱ्या सकाळच्या लोकलगाड्याही प्रचंड गर्दीने वाहत होत्या. विनाअपघात व वाहतूक कोंडीविरहित पर्यटनाचा आनंद लुटता आल्याने पर्यटकांसह स्थानिकांनाही दिलासा मिळाला. एकवीरा-भाजे लेणी परिसर, तसेच भाजे येथील धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांची बुधवारी मोठी गर्दी झाली होती. लोहगडावर भटकंतीसाठी आलेल्या ट्रेकर्सची त्यात भर पडल्याने कार्ला ते भाजे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहनचालकांना वाहने अलीकडेच थांबविण्याचे आवाहन केले.

Web Title: Lonavala Khandala Tourist