लोणावळ्यातील ‘स्वप्ननगरी’ वाचवावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

लोणावळा - ‘स्वप्ननगरी’ असा लौकिक असलेल्या ॲम्बी व्हॅली सिटीतील स्थानिक भूमिपुत्रांसह बेरोजगार झालेल्यांना तेथेच कायमस्वरूपी रोजगार मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात 
आली आहे. 

या संदर्भात आमदार बाळा भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यासह सोळा ग्रामपंचायतींचे सरपंच, आजी-माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पोलिस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

ॲम्बी व्हॅली प्रकल्प अवसायनात निघाल्याने न्यायालयाच्या वतीने तिथे लिक्विडेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिकांसह हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने वेतन मिळालेले नाही. मुळशी धरण परिसरातील अनेक गावांमधील तरुण बेरोजगार झाले आहेत. तरी ‘स्वप्ननगरी’ असा लौकिक असलेला हा प्रकल्प वाचविण्यासाठी सरकारने मध्यस्थी करावी. कर्मचारी, कंत्राटदारांना वेतन मिळवून द्यावे, असे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले.

अर्थव्यवस्थेवर परिणाम 
ॲम्बी व्हॅली प्रकल्प बंद पडल्याने त्याचा थेट परिणाम लोणावळ्याच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. तेथील अनेक कामगार लोणावळ्यात वास्तव्यास होते. नोकरी गेल्याने ते लोणावळा सोडून गेले आहेत. घरे मोकळी पडली आहेत. गजबजलेल्या बाजारपेठा ओस पडल्या आहेत, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.

Web Title: lonavala news aamby valley