भुशी भरले, चला लोणावळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

लोणावळा - पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण सोमवारी (ता. 26) ओसंडून वाहू लागले. लोणावळा परिसरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. 

लोणावळा - पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण सोमवारी (ता. 26) ओसंडून वाहू लागले. लोणावळा परिसरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. 

सध्या भुशी धरणावर वर्षाविहारासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. जून सरत आला तरी धरण न भरल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. आता धरण भरल्याने सलग सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी लोणावळा सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने पर्यटकांनी धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद लुटला. 

Web Title: lonavala news bhushi dam lonaval