लेनच्या शिस्तीसाठी द्रुतगती मार्गावर ‘हाइट बॅरिअर’ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लेन कटिंग, वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी द्रुतगती मार्गावर ‘फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअर’ लावण्यात आले आहेत. खालापूर टोल नाक्‍यावर अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते या उपक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन झाले. यावेळी महामार्गाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, विजय पाटील, रूपाली अंभुरे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत औटी, आयआरबी कंपनीचे अधिकारी कर्नल जोशुआ आदी उपस्थित होते. 

खालापूर टोल नाका ते खंडाळा एक्‍झिटदरम्यान दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर एकूण ५६ फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअर उभारण्यात येणार आहेत. रस्ते विकास महामंडळ, आयआरबी तसेच वाहतूक विभागाच्या वतीने या हाइट बॅरिअरची चाचणी घेण्यात आली होती. द्रुतगती मार्गावर किलोमीटर क्रमांक ३४ ते ५२ दरम्यान पंधरा किलोमीटर अंतरावर खंडाळा घाट सेक्‍शनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे बॅरिअर बसविले आहेत. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. के. पद्मनाभन म्हणाले की, द्रुतगती मार्गावर अपघात, वाहतूक कोंडीचे लेन कटिंग हे प्रमुख कारण आहे. वाहनचालकांमध्ये शिस्त नाही, वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळते. सुरक्षित वाहतूक व कोंडीवर मार्ग काढण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने द्रुतगती मार्गावर ‘इनविसिबल पोलिसिंग’ उपक्रमासह ‘गोल्डन अवर’ घेण्यात येत असल्याचे सांगत गेल्या वर्षभरात बेशिस्त व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या संख्येने कारवाई करण्यात आली असल्याचे पद्मनाभन म्हणाले. द्रुतगती मार्गावरील पहिली लेन केवळ कार व हलक्‍या वाहनांसाठी राखीव आहे. घाट सेक्‍शनमध्ये अवजड वाहने पहिल्या लेनमधून सर्रास जातात, त्यामुळे वाहतुकीची कृत्रिम कोंडी निर्माण होते. यावर पर्याय म्हणून फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअरचा पर्याय निवडला असून, तो यशस्वी झाला तर भारतातील हा पहिला प्रयोग ठरेल, असे ते म्हणाले.

राज्य सरकार उदासीन - पेंडसे
द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरक्षित व्हावी, कोंडी टळावी यासाठी वाहतूक शाखा, पोलिसांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र राज्य सरकार याबाबत उदासीन आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते तन्मय पेंडसे यांनी केली. द्रुतगती मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम राबविण्यासंदर्भात सरकार कार्यवाही करत नाही. ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण नाही, त्यामुळे नाहक बळी जात असल्याचे पेंडसे या वेळी म्हणाले.

Web Title: lonavala news Hight Barrier o Fast Track