लोणावळ्यात मद्यविक्रेत्याला ठोठावला दहा हजारांचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

लोणावळा - येथील नगरपालिकेने राबविलेल्या प्लॅस्टिकविरोधी अभियानात प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरल्याप्रकरणी गवळीवाडा येथील मद्यविक्रेत्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला. 

लोणावळा - येथील नगरपालिकेने राबविलेल्या प्लॅस्टिकविरोधी अभियानात प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरल्याप्रकरणी गवळीवाडा येथील मद्यविक्रेत्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला. 

राज्य सरकारने 1 एप्रिलपासून राज्यात प्लॅस्टिक वापरण्यास बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर परिषदेने व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्या वापरू नये, असे आवाहन केले आहे. मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या मोहिमेत प्लॅस्टिकचा वापर टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच विल्हेवाट लावण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. मात्र, बंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. यापूर्वीही नगर परिषदेने प्लॅस्टिकविरोधी अभियान राबवून हजारो रुपयांचा दंड वसूल केला होता. गवळीवाडा येथील व्हीके वाइन्सच्या दुकानदाराकडून सोमवारी दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

Web Title: lonavala news liquor baron was punished for ten thousand rupees