उपाययोजना कुचकामी; अपघात कायमच

भाऊ म्हाळसकर
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लेन कटिंग, वाहनचालकांना शिस्त लागावी याचबरोबर अपघात रोखण्यात रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलिसांकडून होणारी उपाययोजना कुचकामी ठरत आहे. बेदरकार वाहनचालक व वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

उपाययोजना
गोल्डन अवर
पोलिसांतर्फे ‘गोल्डन अवर’ घेण्यात येत आहे. गर्दीच्या वेळी अवजड व मल्टिॲक्‍सल वाहने टप्प्याटप्प्यात थांबविण्यात येत आहेत.

ब्रायफेन वायर रोप
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने ९५ किलोमीटर अंतरावर ‘ब्रायफेन वायर रोप’ लावून 
उपाययोजना केली आहे. ब्रायफेन वायरमुळे काही अंशी जीवघेणे अपघात रोखण्यास यश आले आहे. 

सीसीटीव्ही कॅमेरे 
बोरघाट व उड्डाण पुलांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सध्या ते बंद अवस्थेत आहेत. अपघात व वाहतूक कोंडीची कारणे शोधण्यासाठी मध्यंतरी ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आला होता. 

फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअर
लेन कटिंग रोखण्यासाठी फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअरचा वापर करत बोरघाटात ५५ हाइट बॅरिअर बसविले होते. मात्र, बेदरकार वाहनचालकांमुळे ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे.

Web Title: lonavala news pune news express way accident lane cutting