द्रुतगती मार्गावरील लेन बंद; वाहतूक संथ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्‍झिटजवळ दरड मोकळी करण्याचे काम (लूज स्केलिंग) रेंगाळल्याने एक लेन अजूनही बंद आहे. सुट्यांचा हंगाम असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामुळे खंडाळा एक्‍झिट ते बोगद्यादरम्यान वाहतूक संथ गतीने सुरू आहे. 

रस्ते विकास महामंडळाच्या वतीने द्रुतगती मार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आडोशी ते खंडाळा एक्‍झिटदरम्यान दरडी पाडण्याच्या कामास तीन महिन्यांपूर्वी सुरवात केली. त्यामुळे धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्यांचे आच्छादन बसविण्यात येत आहे. पायोनिअर कंपनीच्या वतीने हे काम करण्यात येत आहे. दरडी व त्यावर जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू असल्याने अमृतांजन पुलावरील पुण्याकडे येताना एक लेन, खंडाळा एक्‍झिटच्या पुढे बोगद्यादरम्यान, तसेच आडोशी बोगद्याजवळ एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. सुरवातीस दरडी पाडण्याच्या कामामुळे वाहतूक टप्प्याटप्याने थांबविण्यासाठी ब्लॉक घेण्यात येत होते. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे खंडाळा घाटात वाहतूक संथ होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Web Title: lonavala pune news express way one lane close transport