दीड कोटीचे सोने लोणावळ्यातून लंपास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

लोणावळा - लोणावळ्यातील बस स्थानकातून सराफाचे एक कोटी ६० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

गोविंद पुरुषोत्तम आगरवाल (वय ४१, रा. सिटी कॉलनी, पेटला, ब्रुज हैदराबाद, तेलंगण), मोहंमद युसूफ खलिद (वय ४७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सराफ पंकजकुमार गुप्ता (वय ३६, रा. कमलापुरी कॉलनी, हैदराबाद, तेलंगण) यांनी फिर्याद दिली आहे. पंकजकुमार गुप्ता हे बुधवारी सकाळी नोकर गोविंद, मोहंमद यांच्याबरोबर सोन्याचे दागिने घेऊन हैदराबाद येथून मुंबईकडे वॉरेंज ट्रॅव्हल्सने निघाले होते. 

दरम्यान लोणावळ्यातील वळवण येथील एनएच चार हॉटेलच्या थांब्यावर बस थांबली असताना गोविंद याच्या पायाजवळ एक कोटी ६० लाख रुपये किमतीचे नेकलेस, कानातील टॉप्स, लॉकेट असे चार किलो ७७८ ग्रॅम सोन्याचे दागिने 
असलेली ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. गुप्ता यांनी दोन बॅगांमध्ये सोन्याचे दागिने भरले होते. यापैकी एक बॅग लोणावळ्यात चोरट्याने लंपास केल्याचे उघड होताच त्यांनी लोणावळा पोलिसांमध्ये फिर्याद दिली. याप्रकरणी गुप्ता यांच्या दोन नोकरांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: lonavala pune news gold theft