भुशी रस्त्यावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

सलग सुट्यांमुळे पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी

लोणावळा - लोणावळा परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण भुशी धरण गेल्या आठवड्यातच फुल्ल भरले आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी वर्षाविहारासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, त्यांच्या वाहनांमुळे पुणे-मुंबई महामार्गासह भुशी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी शनिवार व रविवारी दुपारी तीननंतर भुशी रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांना बंदी केली होती. तरीही या शनिवार, रविवारी पर्यटकांचा ओघ सुरूच राहिल्याने वाहतुकीवर नियंत्रण राखणे पोलिसांना कठीण गेले. मुसळधार पावसामुळे परिसरातील धबधबे फेसाळत आहेत. खंडाळा, वळवण, भांगरवाडीमार्गे भुशीकडे जाण्याचा काही पर्यटकांनी प्रयत्न केल्याने त्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली.

लोणावळा-खंडाळ्यातील स्थिती
मुसळधार पावसामुळे परिसरातील धबधबे फेसाळत आहेत 
शनिवार व रविवारी वर्षाविहारासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी
पर्यटकांच्या वाहनांमुळे लोणावळा-खंडाळ्यात वाहतूक कोंडी
पोलिसांकडून भुशी धरण रस्ता दुपारी तीननंतर वाहनांसाठी बंद
अनेक पर्यटकांना माघारी फिरावे लागले
शहरातून बाहेर पडण्यासाठी रायवूड, जुना खंडाळामार्गे वाहतूक
कुमार रिसॉर्ट व रायवूड येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद
ध्वनिक्षेपकावरून वाहनचालकांना सूचना
खंडाळा, वळवण, भांगरवाडीमार्गे भुशीकडे जाण्याचा काही पर्यटकांचा प्रयत्न
खंडाळा-वळवण-भांगरवाडी-भुशी मार्गावरही वाहतूक कोंडी

‘द्रुतगती’वरील वाहतूकही विस्कळित
कधी संततधार, तर कधी मुसळधार पाऊस आणि पर्यटकांची गर्दी यामुळे रविवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. द्रुतगतीवरील वाहतूक विस्कळित झाल्याने पर्यटकांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या खोपोली एक्‍झिटपर्यंत रांगा लागल्या होत्या.

Web Title: lonavala pune news traffic jam on bhushi road