पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेने लोणावळ्यात तणाव

Court
Court

लोणावळा - लोणावळा रेल्वे स्थानकात तिकीट संग्राहक असलेल्या उपेंद्र कुमार वीरबहाद्दर सिंह (वय ३९, सध्या रा. लोणावळा, मूळ बिहार) याने शुक्रवारी (ता. १५) दिलेल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. वडगाव न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. १८) कोठडी दिली. 

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर गुरुवारी झालेल्या निर्घृण हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी निषेध करण्यात येत होता. यादरम्यान बाजारात भाजी आणण्यासाठी निघालेल्या उपेंद्र कुमार याने अचानक पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली. त्यामुळे चौकात तणाव निर्माण झाला. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यासह भाजप, मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेत संबंधितावर कडक कारवाईची मागणी केली. जाधव यांनी या वेळी उपेंद्र कुमार यास चांगलाच चोप दिला. पोलिसांनी उपेंद्र कुमार यास ताब्यात घेतले. 

पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जमावास शांत करत कारवाईचे आश्‍वासन दिले. उपेंद्र कुमार हा मानसिक रुग्ण असल्याने त्याने हे कृत्य केले असावे, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. उपेंद्र कुमार याचे रेल्वे स्थानकावर प्रवाशांशी मोठ्याने असंबद्ध बोलणे, गाणी गाणे अशा स्वरूपाचे वर्तन असते.

रेल्वेतून निलंबन
लोणावळा रेल्वे स्थानकावर कनिष्ठ तिकीट संग्राहक असलेल्या उपेंद्र कुमार यास लोणावळा पोलिसांनी अटक केल्यानंतर रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक पनवर यांनी त्यास सेवेतून निलंबित केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com