लोणावळा : स्थानकाजवळ मालगाडीचे डब्बे घसरले, दहा दिवसांत दुसरी घटना

अपघातानंतर मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत
मालगाडीचे डब्बे घसरले
मालगाडीचे डब्बे घसरलेsakal

लोणावळा :  लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी (ता.०७) सकाळी पुन्हा एकदा मालगाडीचे डब्बे घसरल्याची घटना घडली. अपघातानंतर मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दहा दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर इंदौर- दौंड सुपरफास्ट एक्सप्रेसचे दोन डब्बे घसरले होते. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून उतरले .

मालगाडीचे डब्बे घसरले
चिमुकल्यांचा खेळताना झाला घात, दोघा सख्खा भावांसह तिघांचा..

या घटनेमुळे पाठीमागून येणारी मुंबई-बंगलोर उद्यान एक्सप्रेस खंडाळा स्थानकावर थांबविण्यात आली. तासाभरानंतर उद्यान एक्सप्रेस लोणावळा स्थानकातून रवाना झाली. रेल्वेच्या वतीने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत तासाभरात घसरलेले मालगाडीचे डब्बे पुर्वव्रत केले. दरम्यान रेल्वेने वाहतूक प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ वरून वळविण्यात आल्याने रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.

मालगाडीचे डब्बे घसरले
मुंडेंनी घेतले वैजनाथांचे दर्शन,कोरोना नियम पाळण्याचे केले आवाहन

दहा दिवसांत अपघाताच्या दोन घटना

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा स्थानकाजवळ एकाच ठिकाणी इंदौर- दौंड सुपरफास्ट एक्सप्रेसनंतर दहा दिवसांतच मालगाडी घसरणे अशा दोन घटना घडल्या आहेत. रेल्वेच्या वतीने अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट करण्यात आली नसली तरी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने रेल्वे समोर आव्हान आहे. यापूर्वी खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ अशाच प्रकारे मदुराई एक्सप्रेस, मालगाडी घसरण्याच्या घटना घडल्या होत्या. सध्या झालेल्या अपघातांमध्ये मोठी हानी झाली नसली तरी अपघात रोखण्यासाठी अपघाताच्या कारणांचा शोध घेत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com