‘भीमसृष्टीचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर: मंडपाचा खर्च वाया

Bhimsrushti.jpg
Bhimsrushti.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीच्या उद्घाटनाला काही केल्या मुहूर्त मिळेना. राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते आज (ता.७) सकाळी साडेदहा वाजताचा आयोजित कार्यक्रम पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला असून सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे मंडपावरील खर्च वाया गेला. दरम्यान उद्घाटनाचा कार्यक्रमात तीन वेळा बदल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी उभारण्यात आली आहे. या कामाला अगोदरच विलंब झाला होता. भीमसृष्टी काम संथ गतीने होत असल्याने महापालिका प्रशासनावर जोरदार टीका होत होती. शहरातील सामाजिक संघटना आणि संस्थानी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी लावून धरली होती. 

तीन वेळा बदल 
त्यानंतर महापालिका प्रशासनाने काम मार्गी लावल्याचा दावा करत अगोदर 6 सप्टेंबर रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महापालिका प्रशासनाने त्याची निमंत्रण पत्रिका देखील छापली होती.
त्यानंतर त्यामध्ये बदल करत 10 सप्टेंबर रोजी भीमसृष्टीचे उद्घाटन केले जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुन्हा तिसऱ्यावेळी त्यामध्ये बदल करत आज (शनिवारी) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भीमसृष्टीचे उद्घाटन आयोजित केले होते. याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली होती. 
या कार्यक्रमासाठी भीमसृष्टीच्या बाजूला मोठा मांडव टाकण्यात आला होता. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तथापि, अचानक आजचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मांडव काढण्यात आला आहे. तीनवेळा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केल्याने आता सत्ताधारी कधीचा मुहूर्त काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 

…अशी आहे भीमसृष्टी 

भीमसृष्टीमध्ये 19 म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1946 रोजी राज्यघटना सुपूर्द करताना, नागपूर येथील दीक्षाभूमी येथे केलेले भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबियांसमवेत असलेला फोटो, प्रबुद्ध भारत मुकनायाकाचे लायब्ररीत टेबलावर लिखाण करताना, मानगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा नेता घोषित करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळ्या घटनांचे म्युरल्स येथे असणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com