लोणीत काळभैरवनाथ-जोगेश्वरी लग्नसोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

लोणी भापकर - चैत्र कालाष्टमी यात्रेनिमित्त काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा लग्नसोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. सुरवातीला रखरखत्या उन्हामध्ये, तर नंतर अचानक आलेल्या पावसाच्या सरी अंगावर झेलत ‘भैरवनाथांच्या नावानं चांगभलं...’ या गगनभेदी जयघोषात भाविकांचा महापूर लोणी भापकरच्या मंदिरात विवाह सोहळ्यासाठी लोटला होता.

दारासिंग भापकर-पाटील यांच्या वाड्यापासून निघालेल्या मानाच्या काठ्यांनी सायंकाळी पाचनंतर मंदिर परिसरात प्रवेश केला. भाविकांचा मोठा जमाव बरोबर असणाऱ्या मासाळवाडी व परिसरातील काठ्या त्याचप्रमाणे तालुक्‍यातील हजारो भाविकांची संख्या लक्षणीय होती. भैरवनाथांच्या काठ्या ढोल-ताशांच्या गजरात व सनई, तुतारीसह मंदिर परिसरात दाखल झाल्या. भाविकांकडून काठ्यांना नारळ-तोरणांच्या माळा घालण्यात आल्या. भैरवनाथ देवाची आरती होऊन मानकरी, भजनी मंडळ, तसेच पुजारी बाबासाहेब भैरवकर व संजय भैरवकर यांसह ग्रामस्थांनी काठ्या मिरवणुकीचे स्वागत केले. देवांना पोशाख करून सायंकाळी सहाला लोणी भापकरसह पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, माळवाडी, काऱ्हाटी, बाबुर्डी, जळकेवाडी, भिलारवाडी, जळगाव व तालुक्‍यातून हजारो वऱ्हाडी मंडळी या लग्नसोहळ्याला मंदिर परिसरात दाखल होताच सर्वांना अक्षदा वाटण्यात आली. पारंपरिक पद्धतीने विधिवत मंगलाष्टका म्हणत सहा वाजून ४० मिनिटांनी भैरवनाथ जोगेश्वरीचा लग्न सोहळा पार पडला.

Web Title: loni bhapkar news kalbhairavnath jogeshewari

टॅग्स