लोणी काळभोर पोलिसांकडून हुक्का पार्लरवर कारवाई

लोणी काळभोर पोलिसांकडून हुक्का पार्लरवर कारवाई

लोणी काळभोर : पुणे-सासवड महामार्गावरील होळकरवाडी (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील जे 2 के या हॉटेलवर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता. ६) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून बेकायदा चालवणाऱ्या हुक्का पार्लरचे 37 हजार रुपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे.

तर बेकायदा हुक्का पार्लर चालवल्याप्रकरणी हॉटेल मालक अक्षय दिलीप जगताप (वय २९ रा. हांडेवाडी, ता. हवेली ), व्यवस्थापक कुमार विलास गोफणे (वय ३०, रा. होळकरवाडी, ता. हवेली) वेटर सचिन मधुकर मोटे (वय ३३, रा. हांडेवाडी, ता. हवेली) आकाश राजू कहार (वय २४, रा. गाडीतळ, हडपसर, ता. हवेली), गजेंद्र अशोक काटकर (वय ३१, रा. तुकाई दर्शन , हडपसर, ता. हवेली) अशा पाच जणांविरुद्ध  लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल जे 2 के येथे हुक्कापार्लर सह अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती एका गुप्तचारामार्फत पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी (ता. ६ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर पोलिस हवालदार रोहिदास पारखे, नितीन गायकवाड, मारुती बाराथे यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस हॉटेल च्या ठिकाणी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जाऊन पाहणी केली असता, हॉटेलमधून सुगंधित हुक्क्यासारखा वास आला म्हणून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली.

पाहणी सुरू असताना हुक्का पिणाऱ्या लोकांना पोलिस आल्याची चाहूल लागली. त्यानुसार हॉटेलमधील लोक  पश्चिम बाजूला असणाऱ्या दरवाज्यातून पळत गेले. यावर पोलिसांनी हॉटेलची व खोलीची पाहणी केली असता पोलिसांना हुक्क्याचे फ्लेवर्स, आणि इतर साहित्य आढळून आले व हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्यही आढळून आले. यानंतर पोलिसांनी हॉटेल मालक अक्षय जगताप यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिसांत बेकायदा हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com