लोणी काळभोरला विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

लोणी काळभोर - लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल या शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या श्रेयश शहाजी चव्हाण (वय १३, सध्या रा. माळीमळा, लोणी काळभोर. मूळ रा. बामणी, उस्मानाबाद)या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना बुधवारी (ता. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. श्रेयशच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तो आपले मामा नागनाथ शिंदे यांच्याकडे राहण्यास होता. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घराच्या छतावर जाऊन छतावरील लोखंडी सळईला दोरी बांधून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठमध्ये त्याने ‘आपले उर्वरित आयुष्य आपल्या आई-वडिलांना लाभो तसेच स्वप्ने नुसती पाहायची नसतात, तर ती पूर्णत्वाकडे न्यायची असतात’, असे लिहून ठेवले होते. श्रेयश हा शाळेत हुशार होता. त्याने शिवचरित्राचा अभ्यास केला होता. तसेच तो शिवचरित्रावर व्याख्यान देत होता. अशा हुशार विद्यार्थ्याच्या आत्महत्येने शाळेत शोककळा पसरली होती. दरम्यान, श्रेयशच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस हवालदार बाळासाहेब गव्हाणे करत आहेत.

Web Title: loni kalbhor pune news student suicide