लोणीकंद पोलिसांनी केला 57 लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

वाघोली : लोणीकंद पोलिसांनी वाघोलीतील उबाळेनगर येथून 57 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरमाराम विशलाजी तराडीया (वय 30, रा. शिवाजीनगर, पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंदचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांना गुप्त बातमीदारांमार्फत उबाळे नगर येथे अवैध गुटख्याचा मोठया प्रमाणात साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी 'त्या' ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, गुटख्याचा मोठा साठा दिसून आला. ही बाब अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. 

नरेंद्र उबाळे यांच्या मालकीचे हे गोदाम आहे. त्यांनी तराडीया याला भाडे तत्वावर दिले होते. सापडलेल्या गुटख्यामध्ये 45 लाख रुपये किंमतीचा महक सिल्व्हर पान मसाला व 12 लाख रुपये किंमतीचा जर्दा याचा समावेश आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधीकारी सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक दगडू हाके, पोलिस निरीक्षक सुनील राऊत मार्गदर्शनाखाली
 सहा. पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस उपनिरीक्षक संतोष लांडे, कर्मचारी.बी एन सकाटे,एस.एस.होनमाने, व्यवहारे यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonikand police seize 57 lakh Gutkha