बड्या मिळकतकर थकबाकीदारांवर नजर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

चारशे जणांना नोटिसा; टाळाटाळ करणाऱ्यांची मालमत्ता ‘सील’  

पुणे - मिळकतकर आणि पाणीपट्टी सुमारे ९० टक्के वसूल करण्याची तंबीवजा सूचना राज्य सरकारने महापालिका आयुक्‍तांना दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता बड्या थकबाकीदारांवर नजर रोखली आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मिळकतदारांच्या मालमत्तांना ‘सील’ ठोकण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल चारशे थकबाकीदारांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. 

मार्च २०१६ ते एक मार्च २०१७ या कालावधीत सुमारे १ हजार ४७ कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. या वर्षात सुमारे १६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकीदारांची नव्याने यादी तयार केली असून, त्यानुसार त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार नोटीस देऊनही थकबाकी न भरलेल्या मिळकतदारांवर यापूर्वीच कारवाई सुरू करण्यात आली असून, उपनगरांमधील बड्या थकबाकीदारांच्या मिळकती ‘सील’ करण्यात आलेल्या आहेत. 

राज्य सरकारच्या आदेशानुसार मिळकतकराची शंभर टक्के वसुली करण्यासाठी मोहीम सुरू आहे. त्यात, थकबाकी वसूल व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या मोहिमेसाठी सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. वेगवेगळ्या तीन टप्प्यात मिळकतकर वसूल करण्यात येईल. मिळकत करधारकांनी सहकार्य करावे. 
- सुहास मापारी, प्रमुख, करआकारणी व करसंकलन विभाग

Web Title: Look at the big defaulters & income tax