#PmpIssue पीएमपीचा तोटा 204 कोटींवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तोट्याची कारणे 
- घटलेली बस संख्या 
- कमी झालेले प्रवासी 
- घटलेले उत्पन्न 

पुणे - पीएमपीचा तोटा आता 204 कोटी रुपयांवर पोचला असून, उत्पन्नाचे अन्य स्त्रोत 96 कोटी रुपयांवरून 11 कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. परिणामी पीएमपीचे उत्पन्न 62 कोटींनी घटले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे 61 कोटी रुपये वाढवून 210 कोटी रुपयांची मदत केली असली तरी, पीएमपीचे ये रे माझ्या मागल्या! कायम राहिले आहे. त्यामुळे पुढील काळातही सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न दोन्ही शहरांना भेडसावत राहणार असल्याची चिन्हे आहेत. 

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी (ता. 30) सकाळी अकरा वाजता होणार आहे. या बैठकीत गेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. त्याचा आढावा घेतला असता, 2016-17 च्या तुलनेत तोटा पाच कोटींनी कमी झाला असल्याचे भासत असले तरी, तुलनेने यंदा उत्पन्नातही 62 कोटी 41 रुपयांनी घट झाली आहे. अन्य स्त्रोतांमधून पीएमपीचे उत्पन्न घटले आहे. या पूर्वी त्यातून 96 कोटी 97 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तर, सरलेल्या आर्थिक वर्षात फक्त 11 कोटी 80 रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा झाले आहेत. 

नव्या बस कधी ? 
सीएनजीवरील 400 बस खरेदी करण्यासाठीच्या निविदेची मुदत मंगळवारी संपली. आता पुढील आठ दिवसांत निविदा उघडून त्या बाबत निर्णय होऊन बस येणार का ? तसेच 150 इलेक्‍ट्रिक बसची निविदा तयार होण्याच्या आणि त्यानंतर मंजुरीच्या प्रक्रियेत अडकली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी तरी या बाबत काही निर्णय होणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

तोट्याची कारणे 
- घटलेली बस संख्या 
- कमी झालेले प्रवासी 
- घटलेले उत्पन्न 

महापालिकांकडून मदत 
132 कोटी 78 कोटी 
पुणे पिंपरी-चिंचवड 

Web Title: The loss of PMP 204 crores