अन् असे मिळाले कागदपत्रांसहित 70 हजार परत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू जुन्नर येथून बुधवारी मध्यरात्री कबड्डी सामने खेळून परत वाघोलीत आले. केसनंद फाटा येथील पीएमपीएमएल बस स्टॉप जवळ त्यांना रस्त्यावर एक बॅग सापडली. बॅगमध्ये फुरसुंगी येथील अजय निसर्गंध यांची महत्वाची कागदपत्रे व 70 हजार रुपये रोख रक्कम होती

वाघोली : वाघोलीतील केसनंद फाटा येथील पीएमपीएमएल बस स्टॉप जवळ मध्यरात्रीच्या सुमारास 70 हजार रोख रक्कम व कागदपत्रासहित सापडलेली बॅग वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी मूळमालकाला परत केली.             
             

une/young-boy-murdered-kondhawa-pune-257773">पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू जुन्नर येथून बुधवारी मध्यरात्री कबड्डी सामने खेळून परत वाघोलीत आले. केसनंद फाटा येथील पीएमपीएमएल बस स्टॉप जवळ त्यांना रस्त्यावर एक बॅग सापडली. बॅगमध्ये फुरसुंगी येथील अजय निसर्गंध यांची महत्वाची कागदपत्रे व 70 हजार रुपये रोख रक्कम होती. कोणताही संपर्क क्रमांक नसल्याने खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी बँकेच्या कागदपत्रांच्या आधारे हडपसर येथील पंजाब नॅशनल बँकेत संपर्क साधून माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बँकेत संपर्क झाल्यानंतर अजय निसर्गंध यांच्याशी संपर्क साधण्यात यश आले. शुक्रवारी वाघेश्वर मंदिर येथे निसर्गंध यांना अजित मोरे, राहुल जाधव, राकेश जाधव यांनी सुदाम जाधव यांच्या उपस्थितीत बॅग परत केली. वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल अजय निसर्गंध यांनी आभार मानले. तसेच खेळाडूंचे राजेंद्र पायगुडे, केतन जाधव व ग्रामस्थांनी कौतुक केले.
पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lost Bag of Rs 70000 cash along with the documents returned to owner in pune