सासूकडून जावयाला मारण्याची सुपारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पुणे - मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून तिच्या आईनेच जावयाला जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली. सुपारी घेतलेल्या गुंडांनी जावयावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

सनी यादव, असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. शैलेश संजय कांबळे (वय २०, रा. कासेवाडी, भवानी पेठ), चिक्‍या ऊर्फ कुलदीप हनुमंत तुपे (वय २१, रा. बिबवेवाडी), कृष्णा बाळुगोविंद राठोड (वय १९, रा. अप्पर बिबवेवाडी), पवन विकास ओव्हाळ (वय १८, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेवाडी येथे राहणारी शैलेशची आत्या देवई अरुण बागवे यांनी शैलेश यास घरी बोलाविले. थोरल्या मुलीने प्रेमविवाह केल्यानंतर धाकट्या मुलीने प्रेमविवाह करू नये, यासाठी थोरल्या मुलीच्या पतीचे हात-पाय मोडण्यासाठी कोणी मुले आहेत काय, अशी विचारणा केली होती. त्या वेळी शैलेशने हडपसर येथील त्याच्या ओळखीच्या चिक्‍याबरोबर देवई बागवे यांची ओळख करून दिली. त्याने सनी यांचे हात-पाय मोडण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी घेतली. त्यातील वीस हजार रुपयांची आगाऊ रक्कमही घेतली. त्यानुसार आरोपींनी सनी यादव ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली  होती.

दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांकडून रात्रीची गस्त सुरू असताना पोलिस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांना या गुन्ह्यातील आरोपी कात्रज तळ्याच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली.

Web Title: love marriage in pune beating crime