जी मला सोडून जातेय ती दुसऱ्याची काय होणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे : पुण्यात ''शिवडे, आय एम सॉरी'' आणि ''दादा, मी प्रेग्नंट आहे'' असे होर्डींग झळकत असतानाच ''जा तू स्वप्नाली, मी तूला राहू देणारंच नाही'' अाशयाचे पत्र हडपसरमध्ये प्रसिध्द झाले आहे. प्रेमभंग झालेल्या प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारे पत्र एस. एम. जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आ

पुणे : पुण्यात ''शिवडे, आय एम सॉरी'' आणि ''दादा, मी प्रेग्नंट आहे'' असे होर्डींग झळकत असतानाच ''जा तू स्वप्नली, मी तूला राहू देणारंच नाही'' अाशयाचे पत्र हडपसरमध्ये प्रसिध्द झाले आहे. प्रेमभंग झालेल्या प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारे पत्र एस. एम. जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

हडपसर येथे बुधवारी सकाळी एस. एम. जोशी कॉलेजच्या भिंतीवर आणि विजेच्या खांबावर पत्रके लावल्याचे आढळले. ते पत्र वाचण्यासाठी बघ्यांची गर्दी होऊ लागली. पोलिसांना या प्रकारची माहीती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या पत्रात तरुणीविषयी बदनामीकारक मजकूर असल्यामुळे पोलिसांनी ते पत्र तातडीने हटविले. पत्रामध्ये लिहलेल्या आशयावरुन आकाश, स्वप्नली आणि शैलेश अशी तीन नावे समोर आली आहेत.

''तू कुठेही जा, स्वप्नली मी तुला राहूच देणार नाही''
‘स्वप्नली आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होतो. घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न देखील केले. पण ती मला काही महिन्यांपूर्वी सोडून गेली. तिचं माझ्या आईशी पटत नव्हते. तिला माझ्या घरच्यांसोबत राहायचे नव्हते. आता ती शैलेश नामक तरुणाशी लग्न करत आहे. ती पैशांसाठी त्याच्याशी लग्न करत असून नवरा- बायकोचं नाते सोडून कोणी जातं का?. जी मला सोडून जातेय ती दुसऱ्याची काय होणार? तू कुठेही जा स्वप्नली मी तुला राहूच देणार नाही’, असे या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: lover wrote Letter to threaten his girlfriend become Sensationl in pune