पुण्यात दोन वर्षांतील उबदार नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

पुणे - ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर उबदार असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले आहे. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये १२.३ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले. 

पुणे - ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर उबदार असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले आहे. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये १२.३ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले. 

शहरात बुधवारी (ता. २८) नोव्हेंबरमधील सर्वांत नीचांकी तापमान नोंदले गेले. त्यापूर्वी ढगाळ वातावरणामुळे २२.१ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान होते. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आकाश निरभ्र झाले आणि उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले. त्यामुळे शहरातील किमान तापमानात आठवडाभरात ९.८ अंश सेल्सिअसने घट झाली. गेल्या दोन वर्षांमधील हा सर्वांत उबदार नोव्हेंबर ठरला. कारण, गेल्या वर्षी म्हणजे २०१७ ला नोव्हेंबरमध्ये नीचांकी किमान तापमान ११.४ होते. तर, २०१६ च्या नोव्हेंबरला नीचांकी तापमानाचा पारा ९.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. २०१५ मध्ये मात्र १२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यामुळे २०१६ आणि २०१७ च्या तुलनेत यंदाचा नोव्हेंबर महिना उबदार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.  

राज्याचा किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान नगर येथे तापमान ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक, औरंगाबादमध्येही तापमान १० अंश सेल्सिअसजवळ आले आहे.

Web Title: Lowest temperature was recorded