पुण्यात एकविसाव्या शतकातील गणेशविसर्जन मिरवणुकीत सर्वात कमी आवाज घुमला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

एकविसाव्या शतकात प्रथमच गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्वांत कमी आवाजाची पातळी यंदा नोंदवली गेली. अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील दहा चौकांमध्ये आवाजाची पातळी सरासरी ५९.८ डेसिबल होती.​

पुणे - एकविसाव्या शतकात प्रथमच गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्वांत कमी आवाजाची पातळी यंदा नोंदवली गेली. अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील दहा चौकांमध्ये आवाजाची पातळी सरासरी ५९.८ डेसिबल होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांसह नागरिकांनी घेतलेल्या खबरदारीचा हा परिणाम आहे. विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धकाच्या भिंतीचा घटलेल्या वापरामुळे मागील वर्षी ८६.२ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. विसर्जन मिरवणुका रद्द झाल्यामुळे आजवरची सर्वांत कमी पातळी नोंदवली गेली. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकात सर्वांत कमी ५५.५ डेसिबल आणि सर्वांत जास्त खंडोजी बाबा चौकात ६३.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली.

‘सीओईपी’चे प्रा. महेश शिंदीकर यांच्या नेतृत्वात पद्मेश कुलकर्णी, विनीत पवार, नागेश पवार, शुभम अलटे, रुद्रेश हेगु, बालाजी नावंदे आणि भागवत बिरादार यांनी हे सर्वेक्षण केले.

 

Image may contain: text that says "चौकातील आवाजाची पातळी वेलवाग गणपती लिंवराज कुंटे उंवऱ्या गणपती गोखले शेडगे होळकर टिळक खंडोजी वावा आवाजाची पातळी मोजणीची वैशिष्ट्चे स्थळ कालपरत्वे आणि शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण लक्ष्मी रस्त्यावरील २४ तासात आणि १० चौकांतील आवाजाच्या पातळीचा आढावा मागील १८ वर्षांपासून सर्वेक्षणाच्या नोंदी ६१.३ ५५.५ ६१.८ ५८.४ ६०.४ ५६.५ ५८.२ ६०.० ६२.५ ६३.४ मागील काही वर्षातील सरासरी आवाजाची पातळी २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९ ९६.६ မာငး ९२.६ ९०.९ ९०.४ ८६.२"यंदाचे वेगळेपण

  • बहुतेक मंडळांनी जवळच्या हौदातच विधिवत विसर्जन केले
  • देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांची वर्दळ नसल्याने ध्वनी प्रदूषणात घट
  • औद्योगिक क्षेत्रापेक्षा (दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबलची मर्यादा) कमी आवाजाची पातळी विसर्जनाच्या दिवशी नोंदवली गेली

हे वाचा - शांत बेलबाग चौक अन् निवांत पोलिस ; अनंत चतुर्दशीचे दुर्मिळ दृष्य

आवाजाची पातळी मोजणीची वैशिष्ट्ये

  • स्थळ कालपरत्वे आणि शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण
  • लक्ष्मी रस्त्यावरील २४ तासात आणि १० चौकांतील आवाजाच्या पातळीचा आढावा 
  • मागील १८ वर्षांपासून सर्वेक्षणाच्या नोंदी 

बाणेरमधील कोविड हॉस्पिटल फक्त नावापुरतेच का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेला सकारात्मक परिणाम यंदाच्या आवाजाच्या पातळीतून दिसते. आपण आवाजाची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुढीलवर्षीही ढोल-ताशा पथक आणि गणेश मंडळांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. महेश शिंदीकर, उपयोजित विज्ञान विभाग, सीओईपी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lowest volume of the 21st century was heard in Pune