VIDEO : पुण्यात कारला धडकून लक्झरी बस थेट हॉटेलमध्ये घुसली... व्हिडीओ थरकाप उडवेल!

pune accident news
pune accident news

पुण्यातून अपघात झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कारला धडकून लक्झरी बस पलटी झाली. यानंतर हॉटेलमध्ये घुसल्याने 25 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात १० तारखेला रात्री ११.२५ च्या सुमारास मौजे बजरंगवाडी या ठिकाणी झाला. शिरूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

pune accident news
पुणे-सोलापूर मार्गावर शाळेच्या रिक्षाला अपघात, ११ विद्यार्थी जखमी

पुणे-अहमदनगर महामार्गावर एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी डीव्हायडरच्या मधोमध अडकली हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसला धडकली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

लक्झरी बसमधील चालकासह २२-२५ जण जखमी झाले आहेत. यातील ५ जण गंभीर असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. धडक जोरात असल्याने बसचं देखील नियंत्रण गेलं. त्यामुळे अहमदनगरच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरील रॉयल पॅलेस हॉटेलच्या मुख्य दारात ही बस फरफटत गेली. ही दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com