चोरीचे सोने विकण्यासाठी  चोरली आलिशान मोटार

चोरीचे सोने विकण्यासाठी  चोरली आलिशान मोटार

पिंपरी - चोरीचे सोने लुटून त्याची विक्री करण्यासाठी आलिशान मोटार हवी होती. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मोटार पळविणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. दत्तात्रेय अण्णा डुबे (वय ३१, रा. करमाळा, सोलापूर) व दत्तात्रेय पांडुरंग रंधवे (वय २८, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ करमाळा, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.

भिगवण येथे राहणाऱ्या दरोडेखोरांकडून दोन किलो सोने खरेदीच्या बहाण्याने ते हडप करण्याचा कट डुबे व रंधवे यांनी तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने रचला. सोने लुटलेले असल्याने ते हडप केले तरी दरोडेखोर पोलिसांकडे जाणार नाहीत. तसेच लुटलेले सोने खरेदी करणाऱ्याला श्रीमंत वाटले पाहिजे, म्हणून महागडी मोटार त्यांना हवी होती. त्यासाठी जुन्या मोटारी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उमेश चौधरी यांच्याकडील एक आलिशान मोटार टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने डुबे व रंधवे यांनी २८ मार्चला पळवून नेली होती. महिन्याने ती मोशी स्पाइन रस्त्यावर पहिल्याचे चौधरी यांना त्यांच्या मित्राने सांगितले. चौधरी यांनी तिचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले.

दरम्यानच्या काळात नंबर प्लेट बदलण्यासाठी दोघे तळवडे येथे गेले. मात्र, देहूरोड पोलिसांनी मोटार पकडली आणि कागदपत्र घेऊन आल्यानंतर मोटार सोडतो, असे सांगितले. पोलिसांनी पकडलेली मोटार परत मिळावी म्हणून त्यांच्यातील एकाने पोलिसांना स्थानिक आमदाराचा पीए बोलतोय असेही भासवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com