‘मधुरांगण-किड्‌स कार्निव्हल’मध्ये मौज अन्‌ माहितीही

‘मधुरांगण-किड्‌स कार्निव्हल’मध्ये मौज अन्‌ माहितीही

टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनवणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चर शिकविणार

पुणे - तासन्‌तास टीव्हीसमोर बसून कार्टून बघत बसणं, मान मोडेस्तोवर व्हिडिओ गेम खेळत राहणं किंवा उगाचच अंथरुणात लोळत पडून राहणं, यापेक्षा आपल्या पाल्यानं उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी नवीन शिकावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि नावीन्याची ओढ असणाऱ्या प्रत्येक पाल्याचीही! म्हणूनच ‘सकाळ-मधुरांगण’ ने ७ ते १४ वयोगटातील मुलांसाठी एकदिवसीय ‘किड्‌स कार्निव्हल’चे आयोजन केले आहे.

‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये कुकिंग विदाऊट फायर, टेराकोटा क्‍लेच्या माध्यमातून छोटे प्राणी साकारणे, रोपे लावणे या तीन गोष्टींचा समावेश असणार आहे. दररोज आईला स्वयंपाक करताना बघून, आपणही काही बनवून दाखविण्याची ऊर्मी मुलांमध्ये जागृत होत असते, परंतु गॅसजवळ जायचे नाही, या तंबीमुळे मुले हिरमुसली होतात. अशा बल्लवाचार्यांना, मिटकॉनशी संलग्न असलेले आणि चॅनेलवरील प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी ‘कुकिंग विदाऊट फायर’ या संकल्पनेतून काही खाद्यपदार्थ तयार करायला शिकवणार आहेत. मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. यासाठी प्रायोजक आहेत. 

निसर्गाची आवड जन्मतःच प्रत्येकाला असते; परंतु शहरात निसर्ग उरलेलाच नाही. त्यामुळे फ्लॅटमधील उपलब्ध जागेत कुंडीत रोपे लावून जो तो आपली निसर्गाच्या जवळ जाण्याची हौस पूर्ण करून घेत असतो. कुठली रोपे, कुठल्या ऋतूत, कुठल्या दिशेने, कोणत्या आकाराच्या कुंडीत लावायची; किती माती घालायची, किती आणि केव्हा पाणी घालायचे याची शास्त्रीय माहिती प्रत्येकाकडेच नसते. ही सर्व माहिती प्रात्यक्षिकासह मुलांना सागर देशमुख आणि त्यांची टीम देणार आहे. तसेच या वेळेस रु. ३५०/- चे संबंधित उपकरणांचे ‘सॉईल बॉक्‍स ज्युनिअर’ हे कीट विनामूल्य मिळणार आहे. यासाठी प्रायोजक आहेत ‘त्रिविध ॲग्रो टेक सोल्यूशन्स’.

ओल्या मातीत हात बरबटवून घेऊन मनसोक्त खेळणं कुणाला आवडत नाही! आणि या हौसेतूनच काही कलाकृती तयार करायला शिकता येणं म्हणजे सोने पे सुहागाच! सुप्रसिद्ध आर्टिस्ट गौरव काईगडे मुलांना क्‍ले पासून प्राण्यांची शिल्पे घडवायला शिकवणार आहेत. प्रत्येक मुलाला १ किलो क्‍ले मोफत दिला जाणार आहे.

‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये शिकलेल्या कुकिंग विदाऊट फायर, रोपे लावणे आणि जगविण्याविषयीची संपूर्ण माहिती आणि क्‍लेपासूनची शिल्पनिर्मिती या तीनही कौशल्यांचा उपयोग, मुलांना त्यांच्या भावी आयुष्यातही होणार आहे.

‘किड्‌स कार्निव्हल’नंतर त्याच ठिकाणी ‘पालकांच्या जीवनशैलीला वळण लावणाऱ्या ‘हेल्थ का मॉनिटर’ या डीव्हीडीचे प्रकाशन सायंकाळी सहा वाजता होणार आहे. ‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये भाग घेतलेल्या मुलांना सकाळ मधुरांगणतर्फे रु. ३५० किमतीची ही डीव्हीडी मोफत मिळणार आहे. 

रविवारी (२३ एप्रिल) मधुरांगणची सभासद नोंदणी सुरू होणार असून, सदस्यांसाठी किड्‌स कार्निव्हलचे सहभाग शुल्क रू. ६०० असून सकाळच्या वाचकांसाठी रु. ७५० इतके शुल्क रोख भरावे लागेल. माफक शुल्कात रु. १००० पर्यंतचे किट मोफत दिले जाणार आहेत. कार्निव्हलमध्ये मुलांसोबत दोन नॅपकिन आणि पाण्याची बाटली देणे आवश्‍यक आहे.

 स्थळ - मॅजेन्टा लॉन्स, राजाराम पुलाजवळ, डी. पी. रोड
 दि. २३ एप्रिल २०१७, रविवार 
 वेळ : दु. १२.३० ते रात्री ८ 
 अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी - 
८३७८९९४०७६, ९०७५०१११४२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com