मध्य प्रदेशातील महिला सरपंचांना कारभार चालविण्याचे प्रशिक्षण (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मंचर (पुणे) : "गावाचा कारभार करताना विविध युक्‍त्या वापराव्या व विकास योजनांबाबत प्रसंगावधान राखून महिला सरपंचांनी समाजातील सर्व घटकांबरोबर काम करावे. गावात नावीन्यपूर्ण विधायक उपक्रम राबवावेत. त्यामुळे सामंजस्य निर्माण होऊन गाव प्रगतीच्या शिखरावर जाऊ शकते,'' असे राजसत्ता आंदोलनाच्या राज्याच्या पश्‍चिम विभागीय समन्वयक सुनंदा मांदळे यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे महिला राजसत्ता आंदोलन व आगाखान फाउंडेशन मध्य प्रदेश यांच्यातर्फे मध्य प्रदेश राज्यात निवडून आलेल्या 40 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी झालेल्या 3 दिवसीय कार्यशाळेच्या सांगता समारंभात मांदळे बोलत होत्या. या वेळी जिल्हा संघटक लता मेंगडे, राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, सावित्री अकादमीच्या जिल्हा समन्वयक सुरैया पठाण, आगाखान फाउंडेशन संस्थेचे हेमंत खैरनार, अलोक डुगडुग, दत्ता गुरव, मालती सगने उपस्थित होते. मध्य प्रदेश राज्यातील अतिमागास बडवाणी जिल्ह्यातील महिला सरपंच कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

मेंगडे म्हणाल्या ""बाई झाली सरपंच, सुधारला गावचा प्रपंच याप्रमाणे कामकाज करावे. सापशिडीच्या खेळाप्रमाणे अनेक अडचणींना सरपंचांना सामोरे जावे लागते. सामूहिक निर्णयांची अंमलबजावणी करताना ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायतींनी 14 व्या वित्त आयोगातील प्रशिक्षणे राज्य शासनाच्या अधिकृत मान्यता प्राप्त (VTP) संस्थांमार्फतच द्यावीत. दर्जेदार प्रशिक्षण न दिल्यास अनेक चौकशांना सरपंच व ग्रामसेवक यांना सामोरे जावे लागते.''

आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) या गावाला प्रशिक्षणार्थिनी भेट दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh women sarpanchs Training in manchar