esakal | दशभुजा गणपती मंदिर येथे राष्ट्रवादीची महाआरती
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

दशभुजा गणपती मंदिर येथे राष्ट्रवादीची महाआरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कोथरुड विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांनी दशभुजा गणपती मंदिर येथे सकाळी महाआरती करत बाप्पा मोरया असा जयघोष केला. कोरोना (Corona) महामारीमुळे अठरा महिने बंद असलेले मंदिर उघडून बाप्पाचे दर्शन घेता आल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कोथरुड (kothrud) मधील तुळजा भवानी माता मंदिर, मृत्युंजय मंदिर, म्हातोबा मंदिर दर्शनासाठी खुले झाले.

माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर, दत्ता सागरे, मिलिंद वालवडकर, निलेश शिंदे, ज्योती सुर्यवंशी, अर्चना चंदनशीवे, दिलीप कानडे, भुषण शिर्के व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मानकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने प्रार्थना स्थळे उघडण्याचा जो निर्णय घेतला त्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले. देशाला या संकटातून मुक्त कर व सर्वांना भरभराटीचे दिवस येवू दे अशी प्रार्थना आम्ही बाप्पा चरणी केली.

हेही वाचा: पुण्यात असणार १६६ नगरसेवक, ५५ प्रभाग; कच्चा आराखडा तयार

तुळजा भवानी माता मंदिराचे विश्वस्त नवनाथ सुतार म्हणाले की, आज भाविक भक्तांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले असून सकाळी देवीची विधीवत पुजा व अभिषेक करण्यात आली.

loading image
go to top