पुण्यात महाजनादेश यात्रेसाठी झाडे तोडली; मुख्यमंत्री बोलले पण, जावडेकरांचे मौन

पुण्यात महाजनादेश यात्रेसाठी झाडे तोडली; मुख्यमंत्री बोलले पण, जावडेकरांचे मौन

पुणे : महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने पुणे शहरात सिंहगड रोडवर झाडे तोडण्यात आली. याप्रकरणी विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घेत, कारवाईचे संकेत दिले आहेत.

प्रकाश जावडेकरांचे मौन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल पुण्यात होती. या यात्रेसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर फलकबाजी झाली तर, काही ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात आली. सिंहगड रोडवर झाडे तोडण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांनी कालच सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून यावर टीका केली होती. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ‘एक जरी झाड तोडले असले तर, कारवाई केली जाईल.’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनाही या संदर्भात विचारण्यात आले असता त्यांनी यावर कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महापालिकेने घेतली दखल
दरम्यान, केवळ फ्लेक्स लावून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे कान उपटले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार फलकबाजी केल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेनेही त्याची गंभीर दखल घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com