पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

भुयारी मेट्रो मार्गातील रेजहिल्स ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यानचा 1600 मीटरचा बोगद्याचे काम सोमवारी दुपारी पूर्ण झाले. भुयारी मेट्रो मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा पार झाल्याचे महामेट्रोने म्हटले आहे. बोगद्याचा परिघ सुमारे 7 मीटर आहे.

पुणे - भुयारी मेट्रो मार्गातील रेजहिल्स ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यानचा 1600 मीटरचा बोगद्याचे काम सोमवारी दुपारी पूर्ण झाले. भुयारी मेट्रो मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा पार झाल्याचे महामेट्रोने म्हटले आहे. बोगद्याचा परिघ सुमारे 7 मीटर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गात 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग कृषी महाविद्यालय येथील सुरवात होत असून स्वारगेट पर्यंत जाणार आहे. या मार्गांमध्ये शिवाजीनगर बस स्थानक, सिविल कोर्ट , फडके हौद, मंडई व स्वारगेट ही पाचस्थानके असणार आहेत. भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा करून खालुन बांधकाम करण्यात येते व भुयारी मार्गाचे काम टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने करण्यात येते. जेव्हा टनेल बोरींग मशीन भुयारी स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यात दाखल होते, त्याला "टनेल ब्रेक थ्रू' म्हटले जाते. 

पुणे मेट्रोच्या भुयारी कामातील हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे. कृषी महाविद्यालयातून निघालेले टनेल बोरींग मशीन (टिबीएम) हे सिव्हिल कोर्ट येथील स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यात दाखल झाले आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता हा ब्रेक थ्रू टप्पा पार पडला . कृषी महाविद्यालय येथून गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी निघालेले टिबीएम 10 महिन्यांनी शिवाजीनगर न्यायालय येथे दाखल झाले. या बोगद्याच्या उत्तरेकडील भागामध्ये टनेल बोरिंग मशीनच्या कटरने प्रवेश करून हा ब्रेक थ्रू साधला आहे. अशाप्रकारे एन.ए.टी.एम बोगद्यात टनेल ब्रेक थ्रू ही भारतातील निवडक घटनांपैकी एक आहे.

टिबीएमच्या 6. 4 मीटरच्या अजस्त्र कटर हेडने जेव्हा दगड फोडून बोगद्यामध्ये प्रवेश केला तेंव्हा महामेट्रोच्या उपस्थित अभियंत्यांनी जल्लोष केला. सोमवारी दाखल झालेल्या "टनेल ब्रेक थ्रू' मशीनचे नाव मुठा असून त्याच्या सोबतीने मुठा टीबीएम मशीन लवकरच सिव्हिल कोर्टमध्ये लवकरच ब्रेक थ्रू साधणार आहे. 

जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

या प्रसंगी महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे, टाटा प्रोजेक्‍टचे राजेश जैन व बेनी जोसेफ, गुलेरमार्क टाटा प्रोजेक्‍टचे अल्पर आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

पिस्तुलाच्या धाकानं डॉक्टर दाम्पत्याची लूट; कात्रज बोगद्याजवळील घटना

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'आजचा ब्रेक थ्रू हा पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचा महत्वाचा टप्पा आहे. महामेट्रोने पुणेकरांचे मेट्रोत प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी महामेट्रो प्रयत्नशील आहे. महामेट्रो अत्यंत गुणवत्तापुर्वक व सर्व सुरक्षा नियमांना अधीन राहून मेट्रोचे काम वेगाने पुर्ण करत आहे.'

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maha metro pune 1600 meter tunnel completed