महाबळेश्‍वरच्या जैववैविध्याचे होणार संवर्धन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणे - पश्‍चिम घाटातल्या सह्याद्रीच्या रांगात वसलेलं महाबळेश्‍वर-पाचगणी २० वर्षांपूर्वी कसे होते आणि आता कसे आहे? याचा तुलनात्मक अभ्यास करण्याबरोबरच येथील जैववैविध्याचे संवर्धन लोकसहभागातून कसे करता येईल? यासाठी महाबळेश्‍वर-पाचगणी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) व्यवस्थापन समिती प्रयत्न करणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी दिली.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. पटवर्धन यांची नुकतीच निवड झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. 

महाबळेश्‍वर-पाचगणी परिसरात दररोज ४० ते ५० हजार पर्यटक असतात, तर विकेंड आणि सुट्यांच्या दिवसांत ही संख्या लाखाच्या घरात जाते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे महाबळेश्‍वर-पाचगणी या परिसराची पर्यटकांना पेलण्याची क्षमता संपली असून, पर्यटनाचा ताण तेथील जैववैविध्यावर येत आहे. या अनियंत्रित पर्यटनाचे नियोजन करण्याबरोबरच महाबळेश्‍वरमधील निसर्ग संवर्धन करण्यासाठी समिती प्रयत्नशील असेल, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. 

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या या समितीत सातारा जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक यांसह राज्य सरकारचा नगररचना विभाग, केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा विविध विभागांतील पदाधिकारी आहेत. डॉ. पटवर्धन हे आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाचे प्रमुख आहेत.

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर 
महाबळेश्‍वरमधील पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचे नियोजन करण्याचे काम समितीमार्फत केले जाईल. पहिल्या टप्प्यात २० वर्षांत या परिसरात राबविलेल्या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धन झाले का? याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण अचूक होण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. याबरोबरच वनसदृश जमिनीचे मॅपिंग करणे, पाचगणी-महाबळेश्‍वर वाहतूक व्यवस्थापन सर्वंकष आराखडा, ग्रामस्थांशी संवाद वाढविणे, परिसरातील परिसंस्थेचा तुलनात्मक अभ्यास असे उपक्रम हाती घेणार असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी नमूद केले.

Web Title: Mahabaleshwar's bio-diversity being conservation