'महाकरीअर पोर्टल' घ़डविणार तुमचे करिअऱ; करिअरच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा

edu.jpg
edu.jpg

पुणे : दहावी, बारावीनंतर तुमच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार क्षेत्र निवडायचेय! आणि काय त्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागेल ? कोणती शिष्यवृत्ती मिळू शकते ? पुढे काय संधी आहेत?, अशी माहिती हवी आहे. मग एकदा 'महाकरिअर' पोर्टलवर क्लिक करा.

करिअर निवडताना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उकल आता या पोर्टलद्वारे होणार आहे. विद्यार्थ्यांना करिअर निवडताना पडणाऱ्या प्रश्नांना आता एका क्लिकवर निशुल्क उत्तरे मिळणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मे २०२०मध्ये 'महाकरीअर पोर्टल'चे उद्घाटन केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, युनिसेफ आणि आय ड्रीम करियर याच्या सहकार्याने  संयुक्तरीत्या हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. पोर्टलवर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर विषयी हवी असलेली माहिती एकाच व्यासपीठावर मिळू शकणार आहे. देशातील, तसेच विविध देशातील, राज्यातील अभ्यासक्रम, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, इतर निकष, प्रवेश परीक्षा ,उपलब्ध शिष्यवृत्त्या या सर्वांची विस्तृत माहितीसह विद्यार्थ्यांचे समुपदेशन या पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. या पोर्टलवर जवळपास आठ हजार १७५ जणांनी आतापर्यंत लॉगिन केले आहे.

महाकरीअर पोर्टल'चे वैशिष्ट्ये :
- राज्यातील १३,७२८ शासकीय व अनुदानित शाळांमधील ३७.९ लाख विद्यार्थ्यांना उपयोग करता येणार
- प्रत्येक विद्यार्थ्याचा असणार वैयक्तिक डॅशबोर्ड
- प्रत्येक विद्यार्थ्याचा लॉगइन आयडी वेगळा असून, त्याच्या सरल आयडीचा उपयोग करायचा आहे. 
- आयडी शाळेत उपलब्ध होईल
- पोर्टलवर ५५५ व्यावसायिक आणि कौशल्याधिष्टीत करियरची स्वतंत्रपणे माहिती उपलब्ध
- ही माहिती इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे.
- या पोर्टलवर २१ हजार १२२ महाविद्यालय ,व्यावसायिक संस्थांची माहिती असून देशातील आणि अन्य १५ देशातील २.६२ लाख अभ्यासक्रमांची माहिती एकाच व्यासपीठावर
- देशातील जवळपास १, १२७ विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा, अर्जाची प्रक्रिया, पात्रता व विविध निकष याची सविस्तर माहिती उपलब्ध
- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व भारतातील शिष्यवृत्त्याची माहिती

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

देश, विदेशातील पदवीनंतरचे अभ्यासक्रमांची त्याबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. संबंधित अभ्यासक्रम असणारी विद्यापीठे, महाविद्यालये यासह प्रवेश प्रक्रिया, कालावधी, शिष्यवृत्ती अशी माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच 'कोविड-१९'चा काय परिणाम झाला आणि विविध करिअर, उद्योगधंद्याचे भविष्यातील स्थिती या बद्दलही माहिती पोर्टलवर आहे.-दिनकर पाटील, संचालक, राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

शाळा आणि महाविद्यालय यांची जबाबदारी :
- विद्यार्थ्यांना त्यांचा योग्य मार्ग निवडीसाठी सहकार्य करावे
- शिक्षक ,मुख्याध्यापक यांनी वैयक्तिक इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सरल आयडी उपलब्ध करून द्यावा.
- पोर्टलचा उपयोग सहजपणे कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन करावे
- पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे
- करियर निवडीबाबत जाणीव जागृतीचे काम आवश्यक


'महाकरीअर पोर्टल'ची लिंक : "www.mahacareerportal.com"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com