लाल किल्ल्यावर रासपचा झेंडा फडकविणार : जानकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

आघाडीमध्ये मला सहा जागा देत होते. पण, बुडत्या नावेत बसणारा मी नाही. भाजप माढा आणि बारामती रासपला देत होते. पण, चिन्ह भाजपचे देत होते म्हणून त्या जागा स्विकारल्या नाहीत. पक्षातील कितीही लोक सोडून गेले तरी, रासप हा पक्ष वाढत जाणार आहे. मला कोणी डिवचलं तर, त्याला संपावयची ताकद माझ्यात आहे. एक दिवस लाल किल्ल्यावर रासपचा झेंडा फडकविणार आहे.

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी मला कोणी डिवचल तर, त्याला संपवायची ताकद माझ्यात आहे. एक दिवस लाल किल्ल्यावर रासपचा झेंडा फडकविणार असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे.

जानकर यांनी पुण्यात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना युतीकडून तिकीट न मिळाल्याबद्दल स्पष्टीकरण दिले. भाजपने बारामतीतून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जानकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपने नुकतेच जानकर  आणि आठवले यांनी ताकद दाखवा आणि तिकीट मिळवा असे सांगितले होते.

जानकर म्हणाले, की आघाडीमध्ये मला सहा जागा देत होते. पण, बुडत्या नावेत बसणारा मी नाही. भाजप माढा आणि बारामती रासपला देत होते. पण, चिन्ह भाजपचे देत होते म्हणून त्या जागा स्विकारल्या नाहीत. पक्षातील कितीही लोक सोडून गेले तरी, रासप हा पक्ष वाढत जाणार आहे. मला कोणी डिवचलं तर, त्याला संपावयची ताकद माझ्यात आहे. एक दिवस लाल किल्ल्यावर रासपचा झेंडा फडकविणार आहे. काही वर्षांपूर्वी २ जिल्हापरिषद सदस्य होते, आज राज्यभरात ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. पक्ष सतत वाढत जाणार आहे. त्यासाठी पक्षाचे संघटन वाढवले पाहिजे. जो चुकत असेले त्याला प्रश्न विचारा, मग तो मीही असलो तरी चालेल.

Web Title: Mahadev Jankar warns opposition of his rising power ahead of Loksabha election