गर्दी जमविण्यासाठी दोनशे रुपये हजेरी

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता - भा. द. खेर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येण्यापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित महिला.
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता - भा. द. खेर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येण्यापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित महिला.

येरवडा - पर्णकुटी चौकात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येणार होती. या यात्रेला गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दोनशे रुपये हजेरी देण्यात आली. शंभर महिला घेऊन येणाऱ्या प्रमुखास प्रत्येक महिलेमागे शंभर रुपये दिल्याची चर्चा परिसरात आहे.

सध्या राजकीय सभांना गर्दी होत नसल्यामुळे संबंधित पक्षांच्या लोकप्रतिनिधींची मोठी अडचण होत आहे. यावर ‘इव्हेंट मॅनेजमेंट’वाल्यांनी नामी युक्ती शोधून काढली आहे. प्रचार सभा, पदयात्रेला चार तासाला पाचशे, तर आठ तासाला हजार रुपये हजेरी दिली जाते. हाच कित्ता आता लोकप्रतिनिधींनी गिरवला आहे. शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पर्णकुटी चौकात येणार असल्यामुळे संयोजकांना गर्दी जमविणे अवघड होते. त्यांनी महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फक्त एका तासाकरिता महिलांना येण्याची विनवणी केली. त्या बदल्यात दोनशे रुपये देण्याचे कबूल केले. तासाला दोनशे रुपये मिळणार म्हणून महिला तयार झाल्या, तर महिला जमविणाऱ्या प्रमुखाला प्रत्येक महिलेमागे अतिरिक्त शंभर रुपये जादा मिळाले.

कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिरा सुरू झाल्यामुळे अनेक महिला घरी स्वयंपाक करायचाय सांगून परत गेल्या. तर, यात्रा संपल्याशिवाय पैसे मिळणार नसल्याने अनेक महिलांना थांबावे लागले. वेळ लागत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com