‘महाजनादेश’ शहरातून मार्गस्थ

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भा. द. खेर चौकात आल्यानंतर त्यांच्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. या वेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी हात उंचावून अभिवादन केले.
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भा. द. खेर चौकात आल्यानंतर त्यांच्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. या वेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी हात उंचावून अभिवादन केले.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सकाळी पर्वती व खडकवासला मतदारसंघांतून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून (सिंहगड रस्ता) शहराबाहेर रवाना झाली. भाजप नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिकांनी जल्लोष करत यात्रेला निरोप दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या वेळी अनेकांनी शक्तिप्रदर्शन केले. 

शहरात महाजानदेश यात्रेचा दुसरा टप्पा रविवारी सकाळी दांडेकर पुलापासून सुरू झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे, पक्षाच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत रथावर उपस्थित होते. दांडेकर पुलाच्या परिसरात आठ नऊ ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले केले. दत्तवाडी, पु. ल. देशपांडे उद्यान येथे मोठी गर्दी झाली होती. 

भा. द. खेर चौकात नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्यासह नागरिकांनी मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी केली. माणिकबाग चौकातून खडकवासला मतदारसंघ सुरू होत असल्याने तेथे आमदार तापकीर यांनी स्वागत केले. वडगाव येथून मुख्यमंत्र्यांचा ताफा भोरच्या दिशेने रवाना झाला.

३०० किलो हाराची तपासणी 
सिंहगड रस्ता - राजाराम पूल येथे नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल ३०० किलोंचा हार आणला होता. क्रेनच्या साह्याने हा हार त्यांच्या गळ्यात घालण्याआधी तो पोलिसांच्या तपासणीमध्ये अडकला. त्यामुळे याची वेगळीच चर्चा रंगली होती. या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती, शिवाजी महाराज यांचा पुतळा देखावा म्हणून उभारण्यात आला होता.

जगपात यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना पगडी आणि चांदीची तलवार भेट दिली. हिंगणे चौकात ढोल-ताशांच्या गजरात नगरसेविका ज्योती गोसावी, नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com