म्हाळुंगे-माणच्या टीपी स्कीमला मंजुरी

Mahalunge-Maan-Plan
Mahalunge-Maan-Plan

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या म्हाळुंगे-माण नगररचना योजनेला (टीपी स्कीम) राज्य सरकारची अखेर मंजुरी मिळाली. त्यामुळे या स्कीमचा लेआउट (आराखडा) आता अंतिम झाला असून, त्याची अंमलबजावणी १० फेब्रुवारीपासून होणार आहे.

पीएमआरडीएने म्हाळुंगे-माण हाय टेक सिटी प्रारूप नगररचना योजनेला सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर शासनाने या योजनेकरिता लवाद म्हणून ध. शि. खोत या अधिकाऱ्याची नेमणूक केली. खोत यांनी संबंधित जमीन मालकांशी संवाद साधून ही योजना शासनाकडे मंजुरीसाठी सादर केली. महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार या योजनेला राज्य सरकारने दोन महिन्यांत मंजुरी देणे अपेक्षित होते. ही मुदत २ डिसेंबर २०१९ रोजी संपुष्टात आली. राज्य सरकारकडून या मुदतीत त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही योजना अडचणीत येण्याची शक्‍यता होती; परंतु कायदेशीर मुदत संपण्याच्या दिवशीच म्हणजेच २ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सरकारने योजनेला मान्यता दिल्याचे पीएमआरडीएच्या पत्रकावरून स्पष्ट झाले. 

नोव्हेंबर २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टीपी स्कीमचे भूमिपूजन करण्यात आले होते. सुमारे २५० हेक्‍टरवर ही योजना राबविण्यात येत आहे. यातील अंतर्गत रस्ते व सुविधा यांसाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com