दापोडी येथे विद्यार्थांना 'महामानव" ग्रंथाचे वितरण

रमेश मोरे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे : दापोडी येथील बुद्ध विहारातील त्रैलौक्य बौद्ध महासंघ पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानमंदिर अभ्यासिका केंद्रात कालपासून (शुक्रवार) सुरू असलेल्या अठरा तास अभ्यास उपक्रमात विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील आधारीत महामानव"या ग्रंथाचे भेट म्हणून वाटप करण्यात आले.

याच अभ्यास केंद्रातून अभ्यास करून यशस्वी झालेले विद्यार्थी प्रशांत गंधे व सुनील जाधव यांनी आपला वाढदिवस व इतर व्यक्तिगत वायफळ खर्च टाळून वर्षभरातील साठलेल्या पैशांतून महामानव या ग्रंथाच्या ८० प्रती विद्यार्थ्यांना भेट देण्यात आल्या.

सांगवी प्रभागाचे नगरसेवक संतोष कांबळे, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे निमिष कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मागील गेल्या तेरा वर्षांपासून 'अठरा तास अभ्यास' हा उपक्रम या बुद्ध विहारात सुरू असल्याचे येथील धम्मचारी केंद्रचालक ज्ञानोद्युत यांनी सांगीतले.

चौतीस मुलांपासून सुरू झालेल्या या अभ्यासकेंद्रात सध्या दीडशे विद्यार्थी अभ्यास करतात. याचबरोबर  कौशल्य विकास ,कमी दरात न्याहारी व जेवण, तीन पाळणा घर, दोन बालवाड्या असे उपक्रम दापोडी येथे सुरू असल्याचे व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.

नगरसेवक संतोष कांबळे यांनी अठरा तास अभ्यासाला बसलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी धम्मचारी ज्ञानोद्युत, ज्ञानराजा, रविभगत, निमिष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Mahamanav book gifted to students in Dapodi