महाप्रसादात हजारो पुऱ्या अन्‌ ३५ कढया आमटी

आणे (ता. जुन्नर) - श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आमटी-भाकरी महाप्रसादासाठी जमा झालेल्या बाजरीच्या भाकऱ्या.
आणे (ता. जुन्नर) - श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आमटी-भाकरी महाप्रसादासाठी जमा झालेल्या बाजरीच्या भाकऱ्या.

आळेफाटा - आणे (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ६) श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. 

आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी ही माहिती दिली. उद्या, सोमवारपासून दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आण्याची आमटी या नावाने येथील पारंपरिक चवीची आमटी प्रसिद्ध आहे. बाजरीच्या भाकरी गाव व परिसरातील ग्रामस्थ वाजतगाजत आणून देतात. रविवारी दुपारी महाआरती व दानशूर अन्नदात्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, अतुल बेनके, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर खंडागळे, सत्यशील शेरकर, दीपक औटी, वल्लभ शेळके, देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर, सरपंच श्रीप्रकाश बोरा, डॉ. दीपक आहेर आदी उपस्थित होते. 

दरम्यान भास्कर मोहना डोंगरे, लक्ष्मण धोंडिबा आहेर, रामदास गंगाधर गुंजाळ व बंधू, तसेच कै. गणपत बाळा आहेर यांच्या स्मरणार्थ बाजीराव गणपत आहेर हे यावर्षीच्या आमटी महाप्रसादाचे अन्नदाते असल्याचे सांगण्यात आले. आळेफाटा पोलिस ठाण्याच्या वतीने निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमटी-भाकरी वाटपाची जबाबदारी आणे येथील सरदार पटेल हायस्कूल, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी सांभाळली. प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी केले. 

पस्तीस कढया आमटी...
तूरडाळ - ७५० किलो, ३३ तेलडबे, गूळ, शेंगदाणे, खोबरे - प्रत्येकी ३०० किलो, बेसनपीठ - २१० किलो, मीठ ५ गोणी; तसेच लवंग, दालचिनी, जिरे-मोहरी, मिरी, खसखस, कर्णफूल, वेलची, तमालपत्र आदी मसाल्याचे पदार्थ एकूण १७२ किलो. एकूण ३३ ते ३५ कढया आमटी. निव्वळ मसाल्याचा खर्च जवळपास एकूण ४ लाख ५२ हजार ३५८ रुपये अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com