शहरात हर हर शंभोचा जयघोष...

शहरात हर हर शंभोचा जयघोष...

पुणे - लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुका, मंदिराबाहेर मिळणारा प्रसाद, जागोजागी विकायला असणारी पांढरी फुलं आणि कवठाचं फळ आणि हर हर शंभोच्या जयघोषामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या मंदिरांत फुलांची आरास केली होती. प्रत्येक मंदिरात छोटे-मोठे कार्यक्रमही घेण्यात आले. तसेच, शंकराची गाणी लावून भक्त तल्लीन झाले होते.

पाताळेश्‍वर, ओंकारेश्‍वर मंदिरामध्ये दर्शन आणि अभिषेकासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांग लागली होती. दिवसभरात हजारो भक्तांनी दर्शन घेतले. लक्ष्मी रस्ता, नारायण पेठेतील रस्त्यांवर रांगोळ्या काढून शंकराच्या पिंडीची मिरवणूक काढली. चौका-चौकांमधील छोट्या मंदिरांमध्येही भाविकांना प्रसादाचे वाटप झाले. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्‍क्‍याची शंकराची पिंड, मुखवटा  आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. 

सुकामेवा, फळे आणि विविध फुलांचा वापर करून साकारलेली ही चक्केश्वराची पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. माधव जोशी यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला. तसेच, बालगंधर्व रंगमंदिरात पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘जय जय शिव शंकर’ याशिवाय भक्तिपर व इतर मराठी आणि हिंदी भक्तिरचना व भजनांचा कार्यक्रम झाला.

सुगंधी दुधाचे वाटप
स्व. नारायण बाबूराव सारवान प्रतिष्ठानच्या वतीने ससून रुग्णालयातील श्रीवत्समधील अनाथ मुलांना आणि मनजितसिंग विरदी फाउंडेशनच्या वतीने लष्कर भागातील शिवमंदिरांमध्ये सुगंधी दुधाचे वाटप झाले. नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळात भाविकांना साबुदाण्याची खिचडी देण्यात आली. तसेच शंभू महादेव ट्रस्ट, श्री सोमनाथ ट्रस्ट, हरकानगर तरुण मंडळ, श्री  संकट हरणे मंदिर, नवसम्राट तरुण मंडळ, श्री प्रसन्नेश्‍वर मंदिर, श्री भोलेनाथ शिवमंदिर, श्री राजेश्‍वर तरुण मंडळ इत्यादी मंदिर आणि मंडळांमध्ये धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.

मी २० वर्षांपेक्षाही जास्त वर्षे महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडींचे दर्शन घेते. कुमठेकर रस्त्यावरील विश्‍वेश्‍वराच्या छोट्या मंदिरात मी न चुकता दरवर्षी महाशिवरात्रीला जाते. हे मंदिर छोटे असले तरी फार जुने आहे. तिथे महाशिवरात्रीला  गेल्यावर माझे मन 
प्रसन्न होते.
- सरोजिनी ओक, भाविक

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com