मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक 

सनी सोनावळे
मंगळवार, 8 मे 2018

टाकळी ढोकेश्वर - दूध दरवाढीविरोधात भुमिपुत्र शेतकरी संघटने मार्फत पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जुले हर्या येथे संघटनेच्या पदधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दुधउत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालुन निषेध नोंदवला. तसेच लोकांना मोफत दुधवाटप केले.

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, प्रवक्ते अनिल देठे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, तालुकाध्यक्ष रोहण आंधळे उपस्थित होते. 
यावेळी आंधळे म्हणाले, दुध भेसळ हा फार गंभीर मुद्दा असुनही सरकार त्याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही.शेतकऱ्यांनकडुन जे 3.5 फॅटचे दुध घेतले जाते तेच दुध जर ग्राहकाला मिळाले तर सकस दुधाची मागणी वाढेल. अतिरीक्त दुधाचा प्रश्न राहणार नाही. पण दुर्दैवाने ग्राहकाला गायीचे सकस दुध मिळत नाही. सरकारने अनेक वेळा आश्‍वासन देऊनही शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळाली नाही. दुधदरवाढीबाबत त्वरीत निर्णय घ्या अन्यथा भुमीपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांनसह मंत्रालयात जाऊन मोफत दुध वाटप करणार असल्याचा इशारा आंधळे यांनी दिला.

शेतीमालाला हमीभाव नाही
उसाला कारखाने योग्य दर देत नाहीत. म्हणून शेतकरी दूध उत्पादनाकडे वळले आहेत. आता दुधालाही दर मिळत नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला असल्याचे अनिल देठे यांनी सांगितले.

Web Title: maharashtra angry milk producers warns of big movement