Maratha Kranti Morcha : हडपसर येथे 'महाराष्ट्र बंद'ला उत्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठा मोर्चातील नागरिकांनी शांततेत रविदर्शन ते मगरपट्टा चौक व पून्हा रवीदर्शन या दरम्यान पदयात्रा काढली. तसेच गांधी चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करून आरक्षणाची मागणी करत सरकारचा निषेध व्यक्त केला.

हडपसर : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हडपसरमध्ये उत्फुर्त प्रतिसाद लाभला. व्यापारी पेठा, शाळा, महाविदयालये, मदयाची दुकाने तसेच पंडीत जवाहरलाल भाजी मंडई बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडकडीत बंद पाळल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. मात्र रूग्ण सेवा सुरू होती.
 

hadapsar pune

मराठा मोर्चातील नागरिकांनी शांततेत रविदर्शन ते मगरपट्टा चौक व पुन्हा रवीदर्शन या दरम्यान पदयात्रा काढली. तसेच गांधी चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करून आरक्षणाची मागणी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. दरम्यान पीएमपीएल सेवा देखील सुरक्षिततेच्या दृष्टिने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पदयात्रा संपल्यानंतर आंदोलक दुचाकीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. महिला, लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी देखील पदयात्रेत सहभाग नोंदवला. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Maharashtra Bandh Good Response to Maharashtra Bandh at Hadapsar Pune