Maharashtra CM Uddhav Thackeray lonavla ekvira devi
Maharashtra CM Uddhav Thackeray lonavla ekvira devi

उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनाला; शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा?

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) सकाळी कुलदैवत एकवीरा देवीच्या दर्शनाला कुटुंबीयांसह दाखल झाले असून, तेथून ते शिवनेरी किल्ल्यावर जात आहेत. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा मुंबई बाहेरील हा पहिलाच जाहीर दौरा आहे. या निमित्ताने ते शिवनेरीवरून शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

ठाकरे हे गड किल्ले संवर्धनासाठी आग्रही आहेत. राज्य शासनाच्या वतीने २००२ पासून शिवनेरी संवर्धन आणि विकास सुरू आहे. यामुळे हा किल्ला किल्ले संवर्धनाचे माॅडेल ठरणार असल्याने राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी जुन्नर येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेसह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे २००७ पासून करीत आहेत. या मागणीचे निवेदन आढळराव यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना दिले आहे. 

शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीत सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालयाची देखील मागणी आहे. त्यामुळे या दोन्ही मागण्या मंजूर होण्याची घोषणादेखील मुख्यमंत्री ठाकरे करण्याची शक्यता आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बळिराजा कृतज्ञता दिवस साजरा करत आहे. याच दिवशी मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरीवर येत आहेत. या वेळी ते कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांच्यासह शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com