महाराष्ट्र दिनानिमित्त जुन्नरला तहसिल कार्यालयात ध्वजवंदन

दत्ता म्हसकर
मंगळवार, 1 मे 2018

जुन्नर : महाराष्ट्र दिनानिमित्त जुन्नरला तहसिल कार्यालयाच्या आवारात आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम झाला.

या वेळी तहसीलदार किरण काकडे, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, उपविभागीय अभियंता पोहेकर, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, वनक्षेत्रपाल जयंत पिसाळ, पोलिस निरीक्षक कैलास घोडके, कृषी अधिकारी हिरामण शेवाळे आदी अधिकारी,राष्ट्रीय छात्र सेना,पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान तसेच पदाधिकारी व नागरिकांनी ध्वजास मानवंदना दिली. यानंतर झालेली चहापान कार्यक्रमात आमदार सोनावणे यांनी महाराष्ट्र दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी आपले विचार व्यक्त केले. सतीश गाढवे यांनी आभार मानले. 'शिवरायांच्या विचाराचे मावळे व्हा ' आमदार  सोनावणे म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची घोषणा छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानी शिवनेरीवर झाली. यावेळी तत्कालीन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व मंत्री मंडळाने शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार करू असे जाहीर केले होते. आज  त्यांच्या विचारांचे मावळे होण्याची खरी गरज आहे. आपण महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य मानून राज्याच्या विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.  

उपवनसंरक्षक म्हसे यांनी बिबट सफारीचे काम लवकरच सुरू होईल असे सांगितले. तर तालुक्यातील शंभर गावांचे संगणीकृत सातबाराचे काम पूर्ण झाले असल्याचे तहसीलदार काकडे यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra din celebration in Junnar