पुणे : महावितरण कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील शांतिनगर सोसायटीसमोरील विजेच्या खांबावर दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अमोल सांबारे (वय 25, रा. कात्रज) असे त्यांचे नाव आहे.
 

बिबवेवाडी : शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील शांतिनगर सोसायटीसमोरील विजेच्या खांबावर दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अमोल सांबारे (वय 25, रा. कात्रज) असे त्यांचे नाव आहे.

शांतिनगर सोसायटीसमोरील मुख्य लाईनवर सोमवारी सकाळपासून स्पार्किंग होत होते. त्यामुळे रस्त्यावर ठिणग्या पडत होत्या. अपघाताची शक्‍यता लक्षात घेऊन, येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधत दुरुस्ती करण्याची मागणी केली.

Image may contain: 1 person, sunglasses and outdoor

सकाळी साडे दहाच्या सुमारास पद्मावती विद्युत केंद्रातील कर्मचारी अमोल सांबारे व त्यांचा सहकारी दुरुस्तीसाठी खांबावर गेले. काम सुरू असताना सांबारे यांना विजेचा धक्का बसला. महावितरण, अग्निशामक दलाच्या जवानांना पोचण्यासाठी अर्धा तास लागला. तोपर्यंत सांबारे खांबावरच होते, खासगी क्रेनच्या साह्याने त्यांना खाली काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. सांबारे हे मागील सहा महिन्यांपूर्वीच महावितरणमध्ये कायमस्वरूपी कामगार म्हणून कार्यान्वित झाले होते. 

अमोल सांबारे यांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला का इतर कारणाने झाला आहे, याची माहिती शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे महावितरणच्या पद्मावती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन बरकडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra electricity board employees death due to electirc shock in pune