विश्वासदर्शक ठरावात पुरंदरचे जगताप ठरले लकी आमदार      

गजेंद्र बडे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ सदस्य आहेत. त्यामुळे अनुक्रमांक १४४ हा निर्णायकी आकडा आहे. कारण बहुमतासाठी १४५ आमदार अनुकूल असणे आवश्यक असते. जगताप यांनी १४४ आकडा उच्चारला आणि सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे मत सभागृहाचे बनले आणि त्यामुळे जिंकल्याच्या आनंदात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप हे राज्य सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी सभागृहातील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांच्यासाठी शनिवारी (ता. ३०) लकी आमदार ठरले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

बहुमताच्या जादुई आकड्याची सिमांतरेषा (बाँड्री) असलेला १४४ हा जगताप यांना अनुक्रमाक (सिरीयल नंबर) मिळाला. त्यामुळे मी संजय जगताप १४४ असे त्यांनी उच्चारताच, अखेर सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकले, या आविर्भावात  सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  यामुळे संपूर्ण सभागृहाचे लक्ष क्षणभर आमदार संजय जगताप यांच्याकडे गेले.      

आणखी वाचा - उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; 169 आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध

राज्यात नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी शनिवारी मुंबईत राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. यासाठी राज्य सरकारने हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून पुणे जिल्ह्यातील आंबेगावचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती केली होती.   वळसे पाटील यांनी बहुमत ठरावावर काऊंटिंग व्होट (संख्येवर आधारित मतदान) घेण्यात येत असल्याची घोषणा सभागृहात केली आणि त्यानुसार ठरावासाठी अनुकूल असलेल्या आमदारांची शिरगणती सुरू केली. शिरगणतीत प्रत्येक आमदाराने स्वतःचे नाव आणि अनुक्रमांक सभागृहात उभे राहून सांगणे अनिवार्य असते.      
आणखी वाचा - भाजप भेटीपूर्वी अजित पवारांनी फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला; घड्याळ काढले

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ सदस्य आहेत. त्यामुळे अनुक्रमांक १४४ हा निर्णायकी आकडा आहे. कारण बहुमतासाठी १४५ आमदार अनुकूल असणे आवश्यक असते. जगताप यांनी १४४ आकडा उच्चारला आणि सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे मत सभागृहाचे बनले आणि त्यामुळे जिंकल्याच्या आनंदात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

'आम्ही फोडा फोडी केली तर भाजप रिकामी होईल!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Maharashtra floor test in house sanjay jagtap from Purandar Becames Lucky MLA