
राज्य प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या बाबत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पुणे : मालवाहतूक करणारी वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत स्पष्ट करमाफी देणारा सुधारित आदेश राज्य सरकारने गुरुवारी (ता.३) सायंकाळी प्रसिद्ध केला.
- पुणे : गुटखा हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 3.5 कोटींची रोकड अन् 9 जण पोलिसांच्या ताब्यात
कोरोनामुळे राज्यात 25 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मालवाहतूक थंडावली होती. त्यामुळे या वाहनांचा कर माफ करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे मालवाहतूकदारांनी केली होती. राज्य सरकारने त्याची दखल घेत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान वाहनांसाठी करमाफी केली. त्याचा फायदा राज्यातील सुमारे 8 लाख वाहनांना झाला.
- Farmers Protest: आंदोलनाचा चेहरा बनलेल्या सुखदेव यांनी सांगितलं 'त्या' फोटोमागील सत्य!
परंतु, ज्या वाहनमालकांनी 31 मार्चपूर्वी संपूर्ण वर्षाचा कर भरणा केला आहे, त्यांना कर माफीचा फायदा मिळत नव्हता. त्यासाठी संगणक प्रणालीमध्ये बदल झालेला नव्हता. तसेच ज्या वाहनमालकांनी कर भरणा केलेला नाही परंतु, मार्चपर्यंतच्या थकीत कराचा दंडासह भरणा 31 ड़िसेंबरपर्यंत करतील, त्यांनाही पुढील वर्षी 31 मार्चपर्यंतच्या कराच्या रकमेत 50 टक्के सुट मिळणार आहे. त्यामुळे माल, प्रवासी व विद्यार्थी वाहतूक करणाऱया वाहनचालकांना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतच्या करात 50 टक्के सवलत मिळणार आहे.
- Video: 'जर लव्ह जिहाद कराल, तर...'; मुख्यमंत्र्यांनी दिला धमकीवजा इशारा
राज्य प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या बाबत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने काढलेल्या या पूर्वीच्या अध्यादेशांतही असलेल्या त्रुटी त्यांनी परिवहन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुधारित आदेश राज्य सरकारने प्रसिद्ध केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)