देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या खालोखाल गुजरात, सिक्कीम, कर्नाटक या राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळला असल्याचेही प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होत आहे. 

पुणे  : देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या खालोखाल गुजरात, सिक्कीम, कर्नाटक या राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळला असल्याचेही प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होत आहे. 
Map
भारतीय हवामान खात्याने 1 जून ते 11 ऑगस्ट या दरम्यान देशात पडलेल्या पावसाचे राज्यनिहाय नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक सरासरीच्या तुलनेत 32 टक्के पाऊस पडला आहे.

पावसाळ्याच्या या 72 दिवसांमध्ये महाराष्ट्रात सरासरी 667.2 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत 883.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल गुजरात आणि सिक्किम येथे सरासरीच्या 25 टक्के पाऊस पडल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra has the highest rainfall in the country