महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉ. सि. तु. (दादासाहेब) गुजर पुरस्कार पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान व मंगल शहा यांना प्रदान

समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम डॉ. दादा गुजर यांनी आयुष्यभर केले
Maharashtra Health Board Dr C t Dadasaheb Gujar Award to Pune Eye Care Foundation and Mangal Shah
Maharashtra Health Board Dr C t Dadasaheb Gujar Award to Pune Eye Care Foundation and Mangal Shahsakal

हडपसर : "समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम डॉ. दादा गुजर यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सामाजिक कामाची पायाभरणी झाली आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानने एकाच दिवसांत तिरळेपणाच्या १६७ शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा विक्रम केला.

Maharashtra Health Board Dr C t Dadasaheb Gujar Award to Pune Eye Care Foundation and Mangal Shah
Pune Holi 2023 : पुण्यात धुलीवंदनाचा उत्साह, रंगला धुलिवंदनाचा खेळ 

लिम्का व एशिया बुकमध्येही त्याची नोंद घेण्यात आली. आज दादांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने संस्था योग्य दिशेने काम करीत असल्याचा आनंद होत आहे,' असे मत पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन झंवर यांनी व्यक्त केले.

समाजसेवक डॉ. सि. तु. (दादासाहेब) गुजर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या वतीने सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील भरीव समाजिक कार्याकरिता योगदान देत असलेल्या पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान व पंढरपूर येथील पालवी प्रकल्प, प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या मंगल शहा यांना जनसेवा फौडेशनचे डॉ. विनोद शहा यांच्या हस्ते देण्यात आला.

Maharashtra Health Board Dr C t Dadasaheb Gujar Award to Pune Eye Care Foundation and Mangal Shah
Pune News : काँग्रेस पदाधिकाऱ्याचे चंद्रकांत पाटीलांना पत्र म्हणाले, 'दादा पुणेकरांना वाचवा..'

त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन झंवर बोलत होते. शाल, मानपत्र व ५१ हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वानवडी येथील महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला.

आरोग्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सचिव, श्री. अनिल गुजर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष, सतीश आगरवाल, खजीनदार डॉ. यशवंत माने, सहसचिव डॉ. राजेश पवार, डॉ. सतीश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व संस्थेतील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

रजनी भोंडवे, सोनाली सलगर यांनी पुरस्कारार्थींना दिल्या गेलेल्या मानपत्राचे वाचन केले. पुरस्कारार्थी मंगल शहा यांनी एड्सग्रस्त मुलांसाठी करीत असलेल्या आपल्या पालवी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. सुनिता वाडकर व प्रणिता शितोळे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com